बातमीपत्र

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या गोरेगाव जय प्रकाश नगर येथील कार्यालयात गुरुवारी रात्री उशीरा चोरी करण्याचा प्रयत्न केला. राम नाईक याचं जयप्रकाश नगर, शिव स्मृती इमारतीत दुसऱ्यां माळ्यावर कार्यालय आहे. राम नाईक याचं कार्यालय दऱरोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत सुरू असत.
रात्रीच्या सुमारास कार्यालयाच्या दरवाजाचा चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने लॅश आणि कड़ी तोडण्यात आल. मात्र कड़ी तोड़ताना आवाजाने जागे झ्ालेल्या स्थानिकांनी एका चोराला सापळा रचुन पकडले तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झ्ाले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी चोराला धाडसाने पकडून ठेवणाऱ्या राहिवाशांचे आभार मानले. 
वनराई पोलिसांनी चोरट्यांचे चोरी करण्यासाठी आणलेले साहित्य कटावणी आणि स्क्रू ड्रायव्हर जप्त केले आहेत. वनराई पोलिसांनी एका चोराला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला चोर झ्ारखंड राज्यातील असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला २ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वनराई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Live Maharashtra - Hak Tumchi Sath Aamchi
 
Follow Us On Social Media 
 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणार्या घटणा आपल्या समोर लवकरच येत आहे.
पाहत राहा लाईव्ह महाराष्ट्र - हाक तुमची साथ  आमची


आमच्यात सामील व्हा