जालना / प्रतिनिधी
पंतप्रधानपदाच्या नऊ वर्षांच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अनेक योजना जाहीर केल्या. थेट जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांनी ‘मन की बात’सारखा उपक्रम सुरू केला आणि शंभरी पूर्ण करून तो आताही जोमाने सुरू आहे.देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा, यासाठी प्रधानमंत्री ‘जन धन योजना’ त्यांनी सुरू केली. ‘मेक इन इंडिया’मुळे गुंतवणूकदार आणि उद्योजकांमध्ये उत्साह संचारला. ‘श्रमेव जयते’ उपक्रम लघु आणि मध्यम उद्योगांना नवे जीवन देणारा ठरला. मात्र क्रांतिकारी म्हणावे असे पहिले पाऊल त्यांनी उचलले ते नोटबंदीचे काळ्या पैशाच्या व्यवहाराला त्यामुळे आळा बसला आणि त्याचेच पुढचे पाऊल होते ‘डिजिटल इंडिया’ आज अगदी भाजीवाले, वडा-पाववाले, रस्त्यांवर व्यवसाय करणारेही यूपीआयचा वापर करताना दिसतात, त्याचे सगळे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला द्यावे लागेल. असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदार संघाचे विदमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले ते मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना, जालना. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, जालना एशियन डेव्हलपमेंट बैंक भाग-२ निधीअंतर्गत जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील रा.म.मा. ५४८ (९) ते- सोयंजना- हातडी ते येणोर (अंदाजपत्रकीय किंमत रु. ६४६ लक्ष) या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व मजबुती करण करणे या कामाच उदघाटन आज परमार्थ आश्रम गजानन महाराज संस्थान सोयंजना तालुका परतूर जिल्हा जालना येथे राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदार संघाचे विदमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभ हस्ते संप्पन्न झाले या प्रसंगी ते बोलत होते.
संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हभप रामायणाचार्य सतीश महाराज शास्त्री जाधव यांचे कीर्तन झाले कीर्तन सोहळ्याचे आयोजन प्रतीवर्षी परमार्थ आश्रम गजानन महाराज संस्थान सोयंजना तालुका परतूर येथे होत असते. याच गेल्या वर्षीच्या कीर्तन सोहळ्यात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सोयंजना येथील नागरिकांना सोयंजना हातडी ते येनोरा रस्त्याचे मजबुतीकरण खडीकरण व डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन दिले होते दिलेल्या त्या आश्वासनाची पूर्तता आज आमदार बबनराव लोणीकर यांनी संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कीर्तन सोहळ्याचा मुहूर्तावर रा.म.मा. ५४८ (९) ते- सोयंजना- हातडी ते येणोरा (अंदाजपत्रकीय किंमत रु. ६४६ लक्ष) या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व मजबुती करण करणे या कामाच उदघाटन करत प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ केलाहभप रामायणाचार्य सतीश महाराज शास्त्री जाधव यांचे कीर्तन झाले परमार्थ आश्रम चे प्रमुख श्रीनिवास महाराज रमेशराव भापकर बद्रीभाऊ ढवळे, अशोकराव बुरकुले, सुरेशराव सोळंके संपतराव टकले शिवाजीराव पाईकराव पद्माकर कवडे शहाजी राक्षे नितीन जोगदंड रमेश आढाव केशव ढवळे सूर्यभान कदम किरण अंभुरे भरत अंभुरे, सुंदर मुळे बिडवे जिजा प्रसाद ढवळे संभाजीराव खवल लक्ष्मण शिंदे बाबाराव थोरात वसंत भापकर सर्जेराव आघाव बापुराव धुमाळ दत्ताराव धुमाळ गंगाधर सुरुंग आसाराम सुरूंग विश्वनाथ सुरुंग मुंजाजी झरेकर व इतर पंचक्रोशीतील भाविक भक्त नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हभप रामायणाचार्य सतीश महाराज शास्त्री जाधव परमार्थ आश्रम चे प्रमुख श्रीनिवास महाराज रमेशराव भापकर बद्रीभाऊ ढवळे, अशोकराव बुरकुले, सुरेशराव सोळंके संपतराव टकले शिवाजीराव पाईकराव पद्माकर कवडे शहाजी राक्षे नितीन जोगदंड रमेश आढाव केशव ढवळे सूर्यभान कदम किरण अंभुरे भरत अंभुरे, सुंदर मुळे बिडवे जिजा प्रसाद ढवळे संभाजीराव खवल लक्ष्मण शिंदे बाबाराव थोरात वसंत भापकर सर्जेराव आघाव बापुराव धुमाळ दत्ताराव धुमाळ गंगाधर सुरुंग आसाराम सुरूंग विश्वनाथ सुरुंग मुंजाजी झरेकर व इतर पंचक्रोशीतील भाविक भक्त नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
