बातमीपत्र

शासकीय अधिकारी कर्मचारी कंत्राटी भरती चा जी.आर तत्काळ रद्द करा - वंचित नेते नागवंशी संघपाल पनाड

लोणार :- बुलढाणा जिल्हातील  लोणार तालुक्यामधिल लोणार तहसीलदार  यांच्या मार्फत  मुख्यमंत्री साहेब यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले निवेदन. प्रमुख मागण्या सध्या सुरू असलेल्या कोतवाल भरती मध्ये तालुक्यातील कुठल्याही गावातील रहिवासी असलेल्या उमेदवाराला ग्राह्य धरण्यात यावे. शासनाने कंत्राटी भरतीचा काढलेला जीआर रद्द करण्यात यावा. सन२००८ मध्ये मंजूर असलेला लोणार बायपास रोड चे काम तात्काळ करण्यात यावे. किनगाव जट्टू रोडचच्या बोगस  कामाची तत्काळ चौकशी करून ठेकेदाराचा परवाना रद्द करण्यात यावा. शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या रमाई आवास पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान शहराप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा दोन लाख पन्नास हजार(२,५०,००० )देऊन रखडलेल्या घरकुलाचे उद्दिष्ट त्वरित देण्यात यावे या आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना वंचित नेते नागवंशी संघपाल पनाड, महासचिव बळी मोरे, तालुका महासाची सुनील इंगळे, सागर जाधव,भाई विलास लहाने, सुभाष मोरे, युवा शहराध्यक्ष महेंद्र मोरे, शहर उपाध्यक्ष दीपक अंभोरे, कडूबा चव्हाण,  मंगेश मोरे, अजय मोरे, अरबाज पठाण, राहुल चव्हाण, दीपक काळे, सह शेकडो वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा