बातमीपत्र

अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या अन्यथा आंदोलन करू

कारेगाव:- शेतकऱ्यांचे लोणार तहसीलदार यांना निवेदन अंजनी खुर्द महसुल मंडळातील शेतकऱ्यांना सन2021-2022सालचे अतिवृष्टी ची नुकसानभरपाई मिळण्यासाठी तहसिलदार यांना निवेदनाद्वारे मागणी‌ करण्यात आली. लोणार‌ तालुक्यातील अंजनी खुर्द महसुल मंडळातील शेतकऱ्यांना 2021-2022साली झालेली अतिवृष्टीची नुकसानभरपाई अद्याप पर्यंत मिळाली नसल्याने अंजनी खुर्द महसुल मंडळातील शेतकऱ्यांनी लोणार चे तहसिलदार यांना दि.3 आक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले सविस्तर वृत्त असे की अंजनी खुर्द महसुल मंडळात 2021साली अतिवृष्टी झाली होती त्याची हेक्टरी दहा हजार रूपये मदत जाहीर केली होती ती नुकसानभरपाई अद्याप मिळाली नाही तसेच 2022साली संततधार पावसामुळे नुकसान झाल होत त्याची सुद्धा पन्नास टक्के नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती या दोन्हीही सालची अतिवृष्टी ची नुकसानभरपाई मिळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना kyc ( केवासी) करण्याचे सांगण्यात आले होते बर्याच शेतकऱ्यांनी kyc (केवासी)सुद्धा केली त्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा झाली नाही बर्याच शेतकरी बांधवांची नाव तलाठ्यांच्या हलगर्जीपणामुळे kyc(केवासीच्या) यादीत आलीच नाही.त्यामुळे शेतकरी तलाठी कार्यालयात चकरा मारत आहे त तरी सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसानभरपाई तात्काळ देण्यात यावी करीता पंचायत समिती माजी सभापती डॉ.सुरेश हाडे, संजय बुरकुल, अशोक मुंढे, उद्धव आटोळे, सुभाष पाटील ढाकणे, उद्धव नागरे , विनोद ताकतोडे, संजय नागरे, संतोष नागरे , रामचरण कांयदे , सह बरेच शेतकरी बांधवांनी निवेदन दिले लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द महसुल मंडळातील शेतकरी बांधवांना 2021-2022सालची नुकसानभरपाई तात्काळ देण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल आसा ईशारा अंजनी खुर्द मंडाऴातील शेतकऱ्यांनी दिला आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा