मुंबई पोलिसांची जबरदस्त कारवाई शिवडीतील गुन्हेगाराला एकातासात अटक व मुद्देमाल हस्तगत माहिती सविस्तर..
➡️ पोलीस ठाणे - शिवडी पोलीस ठाणे, मुंबई.
➡️ गुरक्र 168/2023 क. 392 भादवि
➡️ फिर्यादीचे नाव - श्री, नवनीत गौरीशंकर मिश्रा, वय ३० वर्षे, धंदा- नोकरी (मर्चट नेव्ही), रा. टी. बिल्डींग नं ५०, रूम नं. ०१, तळमजला, वैती बिल्डींग, कॉपर स्मिथ स्ट्रीस्ट, माझगाव, मुंबई
➡️ गुन्हा घडला तारीख व वेळ - दि. 27/09/2023 रोजी 23.30 च्या सुमारास
➡️ गुन्हा दाखल तारीख व वेळ- 28/09/2023 रोजी 01:30 वा.
➡️ घटनास्थळ बी पी टी रोड, माझगाव डॉककडे जाणारे फाटक गेट, फ्री वे च्या खाली उत्तर वाहिनी
➡️ आरोपी इसम
जाफर अब्दुल शेख वय 27 वर्ष राठी मस्जिद गल्ली नागोरी हॉटेल समोर कौला बंदर झोपडपट्टी रे रोड मुंबई 10
➡️ गुन्हे अभिलेख
1)भायखळा पोलीस ठाणे गुरक्र54/19 कलम 392 भादवी
2)शिवडी पोलीस ठाणे गुरक्र 125/14 कलम 326, 323, 504, 143, 147, 149 भादवी
3)शिवडी पोलीस ठाणे गुरक्र 491/22 कलम 498 भादवि
▶️ चोरीस गेलेला मुद्देमाल
किं. अं. ४०,०००/- किंमतीचा सॅमसंग एम २० अल्ट्रा ग्रे रंगाचा जुना वापरता मोबाईल त्यामध्ये जिओ कंपनीचे सिमकार्ड क्र 7303537459 IMEI NO:- 352649111684781/01
➡️ थोडक्यात हकीकत यातील नमूद तारीख वेळी व ठिकाणी वर नमूद आरोपीताने मोटरसायकल वरती येऊन फिर्यादी यांच्या हातातील वर नमूद वर्णनाचा मोबाईल बळजबरीने हातातून हिसकावून चोरी केला म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला
➡️ तपास- सदर गुन्ह्याची माहिती मिळताच सपोनी खुळे व पथक घटनास्थळी जावून तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी हा शिवडी फाटक च्या दिशेने जात असल्याचे दिसले तसेच चोरीस गेलेल्या मोबाईलचे लोकेशन प्राप्त केले असता ते कॉटन ग्रीन पार्किंग येथे असल्याचे समजले सदर ठिकाणी गेलो असता तो मिळून आला नाही, पुन्हा लोकेशन घेतले असता तो शिवडी फाटक परिसरात असल्याचे समजताच सदर ठिकाणी जावून शोध घेतला असता एक इसम पोलीस पथकास पळून जाण्याच्या बेतात असताना पोलीस पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेवून गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता, नमूद परिसरात त्याच्या KTM मो/सायकल चा शोध घेतला असता आर्यन ट्रान्सपोर्ट शिवडी येथे मिळून आली, मो/सायकल तपासून पाहिले असता त्यात 4 मोबाईल मिळून आले, सदर बाबत विचारणा केली असता त्यात एक वर नमूद वर्णनाचा मोबाईल मिळून आल्याने वर नमूद गुन्ह्यातील मोबाईल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने, सदर आरोपीस माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांची तंतोतंत पालन करून व नमूद आरोपीस अटक करण्यात आले.
हस्तगत मालमत्ता
1)किं. अं. ४०,०००/- किंमतीचा सॅमसंग एम २० अल्ट्रा ग्रे रंगाचा जुना वापरता मोबाईल
2)किं. अं. १५,०००/- किंमतीचा ओपो काळ्या रंगाचा जुना वापरता मोबाईल
3)किं. अं. २०,०००/- किंमतीचा विवो गोल्डन रंगाचा जुना वापरता मोबाईल
4) किं. अं. २०,०००/- किंमतीचा विवो पिस्ता रंगाचा जुना वापरता मोबाईल
5)किं. अं. १,२५,०००/- kTM moter cycle
-------------
एकूण किंमत २,२०,०००/-
➡️ तपास पथक
सपोनी स्नेहलसिंह खुळे
पोहक्र 00566/ मुजावर
पोशिक्र111661/जाधव
पोशिक्र 111627/ आठरे
पोलीस शिपाई 140543/ लाड
पोलिस शिपाई अमोल बच्छाव
➡️ तपासी अधिकारी पोउनि जितेंद्र पाटील व टिम ने हि कारवाई केली.
