भायखळा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी एमआयएमचा गड उद्ध्वस्त केला आहे. यामिनी जाधव यांचा सामना भायखळ्याचे विद्यमान आमदार आणि एमआयएमचे उमेदवार वारीस पठाण यांच्याशी होता. यामिनी जाधव यांनी वारीस पठाण यांचा दारूण पराभव केला आहे. 2014 च्या निवडणुकीत वारीस पठाण एमआयएमच्या तिकीटावर भायखळा मतदारसंघातून निवडून आले होते. यंदाच्या निवडणूकीत यामिनी जाधव वारीस पठाण यांच्या विरोधात उभ्या होत्या. यामिनी जाधव यांना 51 हजार 180 मते मिळाली. तर वारीस पठाण यांना 31 हजार 157 मते मिळाली. जाधव यांनी पठाण यांचा 20 हजार 23 मताधिक्यांनी पराभव केला. भायखळा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच शिवसेनेने भायखळयाची जागा जिंकली आहे. हा तोच मतदारसंघ आहे जिथून १९४६ साली पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी निवडणूक जिंकली होती. या विजयामुळे यामिनी जाधव यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. वाणिज्य शाखेच्या पदवीधर असलेल्या यामिनी जाधव या माजी नगरसेविका आहेत. त्यांना एकूण ५१ हजार १८० मते मिळाली. त्यांनी एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचा तब्बल २०,०२३ मतांनी पराभव केला. काँग्रेसचे मधु चव्हाण २४,१३९ मते मिळवून तिसऱ्या स्थानावर राहिले. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी सुद्धा अखिल भारतीय सेनेच्या तिकीटावर निवडूणक रिंगणात होत्या. मी भायखळयाच्या जनेतची आभारी आहे. त्यांनी माझा विजय सुनिश्चित केला. मी सर्व समाजांसाठी काम करेन. अंमलीपदार्थांची सवय सोडवणाऱ्या केंद्रांची स्थापना करेन. जुन्या इमारतींचा प्रश्नही या भागात आहे. त्यांच्या पूनर्बांधणीसाठी विशेष मेहनत घेईन असे यामिनी जाधव यांनी विजयानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. यामिनी जाधव यांना एकूण ४१ टक्के मते मिळाली. एकूणच सर्व बाबींचा विचार करता शिवसेना ह्या लढवय्या वाघीणीस मंत्री पद बहाल करून खेचून आणलेल्या विजयश्रीस न्याय देईल असे सूत्रांकडून समजते.
