बातमीपत्र

निष्ठावंत यशवंत जाधवांनी साहेबांसाठी त्यागले महापौर पद ! यशवंत जाधव म्हणजे शिस्त, त्याग आणि निष्ठेचे प्रतीक !!

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या आणि मातोश्रीवरून जवळपास नाव निश्चित झालेल्या स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याऐवजी किशोरी पेडणेकर यांचे नाव पक्षप्रमुखांनी निश्चित केले. परंतु यशवंत जाधव यांची महापौरपदाऐवजी स्थायी समितीवरच अधिक गरज असल्याचे पक्षप्रमुखांसह नेत्यांचे एकमत झाल्याने, पक्षप्रमुखांच्या सुचनेनुसार यशवंत जाधव यांनी स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती मिळत आहे.

साहेबांच्या सुचनेला शिरसावंद्य मानत यशवंत जाधव यांनी सलग तिसर्‍यांदा आलेल्या महापौरपदाची संधी सोडत या पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि शेवटच्या क्षणाला किशोरी पेडणेकर यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडल्याचे बोलले जात आहे.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या ऐवजी किशोरी पेडणेकर यांची वर्णी या पदावर लागल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, शिवसेनेच्या अंतर्गत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,महापौरपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत यशवंत जाधव यांचेच नाव अंतिम होते. परंतु महापालिकेतील बदलती सत्ता समिकरणे आणि आक्रमक होणारे भाजप नगरसेवक गृहीत धरता, यशवंत जाधव यांना महापौरपद दिल्यास त्याठिकाणी पुन्हा अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी लागणार होती. त्यामुळे ही निवडणूक घेतल्या बदलती सत्ता समिकरणे पाहता पक्षासाठी धोक्याची ठरणार होती. त्यातच आजच्या घडीला यशवंत जाधव हेच समर्थपणे स्थायी समितीची बैठक घेवू शकतात, यासर्वांचा विचार करता पक्षप्रमुखांनी डॅशिंग यशवंत जाधव यांना महापौरपदाऐवजी याच पदावर राहण्यास सांगितले. त्यावर पक्षप्रमुखांचा आदेश अंतिम असल्याचे सांगत ‘साहेबांसाठी मी महापौरपदाचाही त्याग करेन,असा शब्द देत त्यांनी महापौरपदाच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेण्याची तयारी दर्शवली,असल्याचे सुत्रांनी सांगितले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा