टिक्केवाडी ता भुदरगड येथे अतिवृष्टीमुळे भुजाईदेवीला जाणारा रस्ता ते सरवडे राधानगरीला जाणारा रस्त्यावर 200 फुट डोंगर खचल्याने संपुर्ण जाणारा रस्ता बंद झाला आहे त्या ठिकाणी पहाणी करताना व तात्काळ रस्ता रिकामा करणेसाठी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांनी जि प स्वनिधीतुन 50 हजार रूपये देऊन लोकांच्या वाहतुकीचा मार्ग मोकळा होईल त्या प्रसंगी सर्व ग्रामस्थांनी जीवन पाटील यांचे आभार मानले.यावेळी राजेंद्र पाटील,दिनकर कुराडे,संतोष कांबळे, प्रकाश पाटील,बाळासाहेब पाटील,तानाजी गुरव,आनंदा देसाई,आप्पासो देसाई,व टिक्केवाडीचे पोलिस पाटील व ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच आणि सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
