राधानगरी तालुक्यातील वाकीघोल हा परिसर अतिशय दुर्गम व नेहमी शासनाकडून दुर्लक्षित असा असताना २०१८-२०१९ मध्ये स्थानिक आमदार गावकऱ्याच्या प्रयत्ना मुळे कित्येक वर्षानंतर जळकेवाडी ते सावर्दे हा रस्ता मंजूर करून स्थानिक आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आला परंतु रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा रस्ता उखडायला सुरवात झाली याची दाखल घेऊन Live महाराष्ट्राचे संपादक अनिल कांबळे यांनी बांधकामविभागाच्या अधिकाऱ्यांना निदर्शनात आणून देखील या अधिकाऱ्यांनी कोणतीही दाखल घेतली नाही सहा महिने पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी उखडलेल्या रस्त्यामुळे अपघात व्हायला सुरुवात झाली व आज श्री महालक्ष्मी माध्यमिक विदयाल आडोली चे मुख्याध्यापक व्ही.पी.पाटील यांच्या गाडीचा आपघात अपघात झाला सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु याला जबाबदार कोण ठेकेदार कि अधिकारी असा प्रश्न स्थानिक विचारात आहेत सदर कामाची चौकशी करून ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकरी करत आहेत.
