राधानगरी तालुक्यातील वाकीघोल पैकी चाफोडी गावातील शेतकऱ्यावर गव्याने हल्ला केला यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गारगोटी ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले.शेतकऱ्याच्या पोटात शिंग घुसल्याने गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली गारगोटी येथे उपचार सुरु आहेत. सविस्तर वृत्त असे कि सागर बळवंत पाटील वय ३३ व धनाजी र्शिके वय ५२ हे उस तोड करण्यासाठी ऊसात गेले असता त्याच्यावर अचानक गव्याने हल्ला केला त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी गारगोटीत येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले.
