बातमीपत्र

इतिहासाची प्रेरणा घेऊन शिवशाही अस्तित्वात आणणे हे शिवसेवकाचं कर्तव्य संस्थापक अध्यक्ष मा.मारुती भैय्या सुरवसे यांचा युवकांना संदेश

 शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबई विभाग यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्ययोध्दा वीरांची गौरव गाथा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले, कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले, व्याख्यानामध्ये शिवव्याख्याते बोलताना म्हणतात क्रांतिकारक आपल्या प्राणांची आहुती देऊन हे स्वातंत्र्य मिळवलेले आहेत.

शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष कार्यक्रमात बोलताना युवा तरुणांना सांगतात इतिहास वाचतो आपण इतिहास वाचुन नाही तर छत्रपती शिवराय व मराठा साम्राज्य या इतिहासाची प्रेरणा घेऊन हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणे गरजेचं आहे, आपल्या भारत देश स्वतंत्र झाला पण खऱ्या अर्थाने आज सुद्धा महिलांवर अत्याचार, शेतकरी आत्महत्या, बरेच प्रश्न समाजात आहे, हे होणारे अन्याय नष्ट करण्यासाठी आपल्या युवा तरुणांची टीम तयार करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर हिंदवी स्वराज्याच रक्षण करुन पुन्हा शिवशाही अस्तित्वात आणु असा संकल्प करण्यात आला.

तसेच स्वराज्याचे रक्षणार्थ शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान  मुंबई विभाग पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली, मुंबई विभाग अध्यक्ष मा.शिवसेवक कृष्णा मोरे, अंधेरी विभाग अध्यक्ष महेश मोरे, पवई अध्यक्ष शेखर गावडे, पवई उपाध्यक्ष गौरव हळधनकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थापक अध्यक्ष शिवसेवक मा.मारुती भैय्या सुरवसे, सचिव मा.अशोक झाडे, शिवसेवक विजय केसरकर, गोरक्षक राजेश भानुशाली, शिवसेविका आलिशा चित्तल,कृष्णा मोरे समस्त शिवसेवक परिवार उपस्थित होते.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा