लोणार :- बुलढाणा जिल्ह्या पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत जिल्हा विशेष शाखा येथे हेकाँ सुखदेव ठाकरे कार्यरत आहेत.त्यांचा एक लहान मुलगा एमबीबीएस डॉक्टर होऊन एमडी ची तयारी करीत आहे. तर मोठा मुलगा म्हणजे सुमित ठाकरे ज्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऑल इंडिया रँकिंग 75 वे स्थान मिळवून असिस्टंट कमांडंट पदासाठी प्राप्त ठरला आहे. सुमित ठाकरे यांचे प्राथमिक शिक्षण खामगाव येथे तर नंतर आठवीपर्यंत चे शिक्षण चिखली येथील आदर्श महाविद्यालयात झाले होते. त्यानंतर दहावीपर्यंत बुलढाणा शहरातील भारत विद्यालयाचे विद्यार्थी राहिले त्यांनी मुंबई येथील व्हिजिटीआय संस्थेतून बी टेक चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी यापूर्वी दोनदा यूपीएससी परीक्षेला तोंड दिले पहिल्या वेळेस 11 मार्कांनी इंटरव्यू मध्ये ते मागे राहिले तर एकदा केवळ एका मार्काने त्यांची संधी हुकली होती. तिसऱ्या वेळेस मात्र त्यांनी संधी जाऊ दिली नाही मागील वर्षी 2022 मध्ये त्यांनी असिस्टंट कमांडंट पदाची लिखित परीक्षा दिली होती 3 जुलै ते 27 जुलै 2023 दरम्यान मुलाखती पार पडल्या आणि सात ऑगस्ट रोजी याचे निकाल घोषित झाले. सुमित सुखदेव ठाकरे ऑल इंडिया रँकिंग 75 क्रमांकावर आहेत.या निकालामुळे ठाकरे कुटुंबीयांसह त्यांचे नागझरी गावकऱ्यांना गगन भरारी आनंद झालेला आहे.सुमित चे वडील सुखदेव ठाकरे यांनी बरीच वर्ष अँटी करप्शन ब्युरो मध्येही काम केलेले आहे. हवालदाराचा मुलगा असिस्टंट कमांडंट बनणे हे उदाहरण छोटे नाही सुमित ठाकरे यांचे प्रशिक्षण होऊन त्यांची वर्णी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये लागणार आहे .
काल 11 ऑगस्टला सुमित ठाकरे यांचा नागरी सत्कार नागझरी खुर्द व नागझरी बु.येथील गावकर्यांच्या वतीने ठेवण्यात आला होता. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर नागझरी गावातील पहिला क्लासवन अधिकारी होण्याचा बहुमान मिळवलेले सुमित ठाकरे यांचा सत्कार करताना प्रत्येक गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्या सुगन मामा चा सुमित class-1 अधिकारी होतो व त्यांचा सत्कार करण्याचं भाग्य आपल्याला मिळत आहे हे आपलं नशीब अशी भावना प्रत्येक गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.या कार्यकामाचे अध्यक्ष दिलीप गवई ( सरपंचपती) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन गजानन देवकर हे होते, विचार पिठावर यावेळेस सुखदेव विक्रम ठाकरे, सौ.मीराताई ठाकरे हे होते.
कार्यक्रमचे सूत्रसंचालन पत्रकार कैलास राऊत यांनी केले तर प्रास्ताविक एडवोकेट पवन गवई यांनी केले.सूत्रसंचालन करत असतांना कैलास राऊत यांनी त्यांच्या जीवनात घडलेला प्रसंग सांगितला व त्यावेळेस केलेली सुखदेव ठाकरे यांनी कैलास राऊत यांना खामगाव येथे शिक्षण घेत असताना दिलेला आधार व केलेली मदत त्यामुळेच मी आजपर्यंत काहीतरी करू शकलो आहेत हे ऐकून सर्वांच्या डोळ्यात आपसूक पाणी आले.पवन गवई यांनी सांगितलेली कविता ही सर्वांचा मनात घर करून गेली.या कार्यक्रमाला दिलीप गवई,शिवाजी गवई,गजानन मामा देवकर यांनी आपले विचार मांडले.व शेवटी ज्यांचा आपण सत्कार ठेवला होता व ज्यांना सर्वांना ऐकायचं होतं त्यांचं भाषण खूप मार्मिक व प्रत्येकाला प्रेरणा देणार होतं.सुमित नं आपल्या भाषणात सांगितले की सुगन मामा चा पोरगा अधिकारी होऊ शकतो तर या गावातील प्रत्येक विद्यार्थी अधिकारी होऊ शकतो.... या प्रवासात खूप अपयश येतात,पण या अपयशाला कधीही negative बघू नका. तुम्हाला हे अपयश आयुष्यात खूप हरवण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही कधीही खचून जाऊ नका.यशाला मेहनतीशिवाय पर्याय नसतो.असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात सर्वजण सुमित चा सत्कार करत होते पण सुमितचि आग्रह इच्छा होती की मला माझ्या आजीचा म्हणजे लक्ष्मीबाईचा सत्कार करायचा आहे कारण या यशामागे माझ्या आजीचा खुप मोठा वाटा आहे. सुमित आपल्या आजीचा सत्कार करत असताना सर्वांचे डोळे पाणावले होते...
- सुमित आता लाल दिव्याच्या गाडीत बसणार त्याचा खूप सारा तामजाम असणार, सर्व सुख- सुविधा असणार पण या यशामागे मेहनत, चिकाटी, प्रालब्ध व नशीब यांचा संयुक्त योगायोग असल्याशिवाय हे यश मिळत नसतं.
-सुमित नं आपल्या यशाच श्रेय आपले आई-वडील,शिक्षक यांना दिलं.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन काटे मित्र मंडळ व संपूर्ण गावकऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी गावातील महिला व पुरुष सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
