सराटे अंतरवाली येथे पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलनात लाठी चार्ज केल्याची दुर्दैवी घटना घडली असून यामध्ये दोषी असलेल्यावर एस आय टी मार्फत चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्राद्वारे केली आहे.
