गुन्हेगारी प्रवृत्तीपासून सावधान बाळगण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव या अनुषंगाने पॅन इंडिया जन जागृती अभियान तालुका विधी सेवा समिती खेड असोसिएशन बार खेड तालुका कायदे तज्ञ पतंगे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार व आंबळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधीश माननीय श्री.संजय देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामिनी यमाई कनेरसर मंगल कार्यालय या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मार्गदर्शन शिबिर पार पडले.कनेरसरयेथील नागरिकांनी कायदेतज्ज्ञाची वाजतगाजत मिरवणूक काढून केले स्वागत जिल्हा सत्र न्यायाधीश देशमुख साहेब यांनी आपले विचार व्यक्त करताना गुन्हे कसे घडतात ते का घडतात त्यांची उगमस्थाने कोणती आणि नेमके कारणे काय? गुन्ह्याची पद्धती धार्मिक,आर्थिक,नैमित्तिक,वासना,लोभ परस्री किंवा परपुरुष संबंध असे प्रत्येक गुन्हा मागे काही ना काही कारण जरी असले तरी गुन्हेगारात विकृती मनोवृत्ती हे मूळ कारण आहे असे विचार व्यक्त केले.त्यावेळी खेड तालुका बार असोसिएशन अध्यक्ष वकील मॅडम व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
