सामाजिक समतोल बिघडतं चालला आहे. अशा वेळी समतेच्या व न्यायाच्या विचारांच्या प्रसारासाठी महात्मा फुले व क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची जागृती करणे काळाची गरज असे प्रतिपादन K. Y. धम्मरक्षित सर यांनी केले ते वेसर्डे येथील मा. दिनकराव जाधव हायस्कूल वेसर्डे येथे सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते. यावेळी गणित विभाग प्रमुख सुभाष कापसे सर, सुधीर ठाकूर सर प्रमुख उपस्थितीत होते. आपल्या मनोगतात निकाडे सर म्हणाले कि फुले दाम्पत्य हे श्रीमंत होते. ज्यावेळी घरातून बाहेर काढले त्यावेळी फुले दांम्पत्याने संपत्ती पेक्षा शाळा सुरु करण्यास प्राधान्य दिले. सावित्रीबाईंनी अनेक संकटाना तोंड देत dhiryane शाळा चालविल्या त्यामुळेच आजच्या महिला विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत. यावेळी प्रमोदिनी पालकर, प्रणव चव्हाण, सानिका पाटील, राजश्री कांबळे,चांदणी पाटील, सुरेखा कोटकर आदी विध्यार्थांनी मनोगते वेक्त केली. यानंतर मृणाली सावंत व प्रणाली पालकर यांनी ओव्या सादर केल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमारी शिंदे हिने केले. स्वागत गीत 10 विच्या मुलींनी म्हंटले मनोज कांबळे सरांनी आपल्या मनोगतमध्ये सावित्रीबाइंच्या जीवनातील संघर्षमय विविध प्रसंग सांगितले. यावेळी शिवाजी पाटील, मधू बागडी, साताप्पा कांबळे, जॉन डिसोझा, संभाजी केळस्कर उपस्थित होते.सूत्रसंचालन निशा कोटकर, व अल्फीजा शेख स्वागत सुरेखा कोटकर हिने तर आभार साक्षी केळस्कर हिने मानले.
साप्ताहिक बातम्या
विलवडे स्थानकात थांबा...
Sep 12, 2026
गणपती सणाला जाण्यासाठी...
Sep 13, 2026
पर्यावरणपूरक उत्सवाचा...
Sep 13, 2026
केंद्रीय गृह व सहकार मंत्री...
Sep 13, 2026
