चौधरवाडी वरूडे.तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी कोकणची आई आदिमाया शक्ती शेडूमातेच्या यात्रेच्या निमित्ताने ह.भ.प. रामायणाचार्य वैष्णवी दिदी यांनी कीर्तनातून जनजागृती केली. त्याचप्रमाणे तानाजी भोसले वाघेरी कर यांचा लोकनाट्य तमाशा कलावंतांनी आपले विचार व्यक्त करताना येणारी प्रत्येक वादळे आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी येतात.कर्तुत्वान व्यक्तीला आयुष्यात वेळोवेळी झालेली डंख हे नवे पंख देऊन जातात.कोरोना च्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्ष लोक कलावंतांवरती उपासमारीची वेळ आली होती पण आता परत आम्हा कलावंतांना सुगीचे दिवस आले आहेत किती असू द्या खडतर प्रवास त्याची आम्हाला पर्वा नाही.संगीत रत्न तानाजी भोसले वाघेरी कर यांचा तमाशा चा कार्यक्रम शेडू माता यात्रेच्या निमित्ताने चौधरवाडी वरुडे तालुका खेड जिल्हा पुणे याठिकाणी संपन्न झाला यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब रामभाऊ चौधरी,उपाध्यक्ष अर्जुन नाना चौधरी,दिलीप जयवंत चौधरी माजी उपसरपंच वरुडे,अशोक कोंडे भाऊ चौधरी पोलीस पाटील संघटना अध्यक्ष खेड,अविनाश चौधरी ग्रामपंचायत नवनिर्मिती सदस्य,नवनाथ चौधरी फौजी,पोपटशेठ चौधरी,लक्ष्मण शेठ चौधरी,रामदास चौधरी यात्रा कमिटीचे सदस्य व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.जागतिक महिला दिनानिमित्त वरुडे नगरीतील चौधरवाडी येथे संगीतरत्न मा. तान्हाजीराव भोसले (वाघेरीकर ) यांचा लोकनाट्य तमाशाला भेट देऊन त्यांच्या फडातील सर्व माझ्या माय माऊलीचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी राष्ट्रवादी युवती अध्यक्ष आशाताई तांबे, ग्रामसेवक अशा बळे मॅडम, कृषिसहायक तेजस्विनी बांगर मॅडम, ऑपरेट विद्या चौधरी मॅडम, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील,यात्रा कमिटीचे अध्यक्ष, तमाशातील सर्व कलावंत, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
