ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ, नाशिक संचलित डे केअर सेंटर शाळा आयोजित कविवर्य आनंद जोर्वेकर व त्रंबक बापूजी ठोंमरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विश्वविक्रमी भरारी घेतलेली जिल्हास्तरीय 27वी बालकवी स्पर्धा मंगळवार दिनांक 15/9/2026 रोजी उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेला नाशिक मधील प्रसिद्ध लेखक,कवी मा.दत्ता पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी मा.जयंतजी ठोंमरे,मा.नंदकिशोर ठोंबरे,मा.चिदानंद फाळके,मा . अलकाताई कुलकर्णी, मा. सुनील हिंगणे , मा.अंजना भंडारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मा. गोपाळ पाटील सर,संस्थेच्या सचिव मा.अंजलीताई पाटील, सहसचिव मा.अनिल भंडारी सर, संस्थेचे सदस्य मा.अजय ब्रम्हेचा, मा.शोभना पाटील, मा.छाया निखाडे, मा.विवेक सायखेडकर उपस्थित होते . दिनांक 22 ऑगस्ट 2026ते 5 सप्टेंबर 2026 दरम्यान ही स्पर्धा तालुकास्तरावर घेण्यात आली.या स्पर्धेत पेठ, येवला, कळवण, सिन्नर, चांदवड,मालेगाव, दिंडोरी, नांदगाव,इगतपुरी, निफाड या तालुक्यांमधील एकूण 125 शाळा व 1509 विद्यार्थी सहभागी झाले होते यापैकी स्वरचित गटातील 60 स्पर्धकांची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड करण्यात आली होती. शहर स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेसाठी बालवाडी ते 2री- किलबिल गट,3री ते 5वी- बालगट असे अन्यरचित काव्य वाचनाचे गट होते. स्वरचित काव्य वाचनात कुमार गट इयत्ता 6वी ते 8वी, किशोर गटात 9वी ते 12वी असे आयोजन करण्यात आले होते. एकूण 41 शाळांनी व 750 बालकवींनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. बक्षीस वितरण प्रसंगी कार्यक्रमासाठी लेखक, कवी मा. दत्ता पाटील प्रमुख अतिथी, तर परीक्षक म्हणून मा . मंजुषा पांगारकर, मा. भैरवी चित्राव, मा.उज्वला कहाने ,मा.गायत्री वाणी, मा.श्रुती भोर,केतकी बागुल, मा.प्रीती देवरे, मा.अलका अमृतकर, मा.स्वानंद पारखी, मा.देवडे सर चांदवड,मा.सुजाता येवला, मा.अर्चना नावरकर , मा.यशस्वी रहाळकर , मा. नंदकिशोर ठोंबरे, मा.संदीप गुजराथी ,मा. डॉ.चिदानंद फाळके,मा. अलकाताई कुलकर्णी, मा. जयंतजी ठोंमरे,मा. राज शेळके,मा. सुनील हिंगणे, मा. दिगंबर देवढे,एबीपी माझा चे पत्रकार मा.मुकुल कुलकर्णी उपस्थित होते. प्रतिमा पूजन, ग्रंथ पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आलेल्या परीक्षकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे..
शहरी भागातील-
किलबिल गट
प्रथम क्रमांक- निहिरा निलेश पाठक( सिम्बॉयसिस स्कूल )
द्वितीय क्रमांक- ऊर्जा मनोज गीत (सिम्बॉयसिस स्कूल)
तृतीय क्रमांक काव्य योगेश खोटरे ( डे केअर सेंटर प्राथमिक शाळा )
उत्तेजनार्थ क्रमांक*1.- देवश्री गजानन देव (सिम्बॉयसिस स्कूल )
उत्तेजनार्थ 2. अद्विक रोहन डोईफोडे( सिम्बॉयसिस स्कूल )
उत्तेजनार्थ 3.राजविका स्वलिन शिरोडे (नासिक केंब्रिज )
उत्तेजनार्थ 4. शिवांश सारंग नाईक( आदर्श विद्या मंदिर )
उत्तेजनार्थ 5.निराली राहुल गुबाडे (सरस्वती गुलाबराव पाटील )
उत्तेजनार्थ 6 राही पद्मनाभ नागणे( इंग्लिश मीडियम स्कूल )
बालगट इयत्ता तिसरी ते पाचवी -
प्रथम क्रमांक प्रयाग दीपक सैंदाणे ( डे केअर सेंटर प्राथमिक शाळा )
द्वितीय क्रमांक सम्राज्ञी प्रवीण सूर्यवंशी( जनता विद्यालय पवन नगर )
तृतीय क्रमांक शौर्य राहुल मोकळ (भोसला मिलिटरी स्कूल )
उत्तेजनार्थ क्रमांक 1. आदिती जयेश देसले (सिम्बॉयसिस स्कूल )
उत्तेजनार्थ 2. भक्ती शरद भुजबळ (प्राथमिक विद्यालय उंटवाडी )
उत्तेजनार्थ 3. दिया सुनील चौधरी (डे केअर सेंटर इंग्लिश मीडियम स्कूल )
उत्तेजनार्थ4. प्रांजळ उमाकांत पोरजे( इंग्लिश प्रेप स्कूल )
उत्तेजनार्थ 5. शौर्य रविदास भदाणे( सिम्बॉयसिस स्कूल )
किशोर गट- स्वरचित काव्यवाचन इयत्ता सहावी ते आठवी
प्रथम क्रमांक प्रथमेश दत्तू मुसांडे (विद्या प्रबोधिनी )
द्वितीय क्रमांक स्वामिनी सुरेश नवले (विद्या प्रबोधिनी )
तृतीय क्रमांक आदित्य पवन देवरे (नाशिक केंब्रिज )
उत्तेजनार्थ 1. माधवी विजय धनवटे (डे केअर सेंटर माध्यमिक शाळा )
उत्तेजनार्थ 2.अंजनी संदीप पिंपरकर (जनता विद्यालय )
उत्तेजनार्थ 3. स्वरा गजानन देव सिम्बॉयसिस स्कूल
उत्तेजनार्थ 4. अर्णव नितेश पुरकर नाशिक केंब्रिज स्कूल
कुमार गट -स्वरचित काव्यवाचन इयत्ता सहावी ते आठवी
प्रथम क्रमांक कामाक्षी सोनावणे ( विद्या प्रबोधिनी शाळा )
द्वितीय क्रमांक- निधी सैंदाणे (डे केअर सेंटर माध्यमिक शाळा )
तृतीय क्रमांक- मानव शिरोडे पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल उत्तेजनार्थ- 1.सोहम नारखेडे सिम्बॉयसिस स्कूल
उत्तेजनार्थ 2. पार्थ सोनवणे (डे सेंटर माध्यमिक शाळा )
ग्रामीण भागातील स्पर्धेचा निकाल
किशोर गट
प्रथम क्रमांक ईश्वरी तुषार निकम जानकारी (माध्यमिक विद्यालय कळवण )
द्वितीय क्रमांक दुर्गेश दत्तात्रय सोनार( कै. ल.रा.काबरा विद्यालय मालेगाव )
तृतीय क्रमांक- निशा नामदेव शेखरे (ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आंबेगण पेठ )
उत्तेजनार्थ 1.हेमांगी किसन ठाकरे (डॉ. विजय बिडकर जनता महाविद्यालय )
उत्तेजनार्थ 2. अक्षर संदीप गुजराथी (श्री नेमिनाथ जैन विद्यालय चांदवड )
उत्तेजनार्थ 3 . भावना प्रकाश गुडेकर (सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालय नांदगाव )
कुमार गट
प्रथम क्रमांक प्राची भरत देवरे (जानकारी विद्यालय कळवण )
द्वितीय क्रमांक शर्वरी शशिकांत दशपुते (जानकारी विद्यालय कळवण )
तृतीय क्रमांक मृदुला शांताराम मोरे (माध्यमिक विद्यालय कळवण कळवण)
उत्तेजनार्थ 1. योगेश्वरी चंद्रकांत शेलार (के बी एच विद्यालय मालेगाव)
उत्तेजनार्थ 2. श्रुती श्रावण गायकवाड (स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला )
उत्तेजनार्थ 3 कांचन गणेश आव्हाड (ब्रह्मानंद हायस्कूल डोडी सिन्नर )
बक्षीस वितरण प्रसंगी बोलताना मा.दत्ता पाटील प्रमुख अतिथी म्हणाले की कविता म्हणजे निरागसता, निर्मळपणा, उत्सुकता आहे . ज्ञानवर्धिनी या संस्थेने बालकवींसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याचे कौतुक केले. सर्व बालकवींना फुलपाखरू ही उपमा देऊन आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
ज्ञानवर्धिनी संस्थेचे अध्यक्ष मा.गोपाळ पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की ज्ञानवर्धिनी ही परीक्षार्थी नाही तर माणूस घडवण्याचा ध्यास घेऊन सतत प्रयत्न करत आहे आज आमचे माजी विद्यार्थी परीक्षक म्हणून मंचावर उपस्थित आहेत. हे आमच्या सततच्या प्रयत्नांची फलश्रुती आहे तसेच बालकवींना व्यासपीठ मिळावे म्हणून आम्ही 27 वर्ष ही स्पर्धा सातत्याने घेत आहोत. तसेच सर्व सहभागी व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तसेच सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मा. अनुजा पाठक, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मा.राजेश भुसारे , इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका मा.तनुजा कुलकर्णी तसेच बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका मा. मंजुषा सरनाईक, मा. अर्चना आहेर उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मा.कांचन घुगे व मा.दिपाली कुलकर्णी यांनी केले.
