बातमीपत्र

वीज समस्या सोडवल्याने पाथर्डीत आनंद; महावितरण अधिकारी घुमरे-जाधव यांचा नागरिकांकडून सत्कार

नाशिक - पाथर्डी परिसरातील वीज समस्यांवर प्रभावी उपाययोजना केल्याबद्दल महावितरणचे सहाय्यक अभियंता किशोर घुमरे व अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण जाधव यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. वडाळा उपकेंद्राची उभारणी,पाथर्डी उपकेंद्राची क्षमता वाढ,भूमिगत केबलिंग व फिडरचे नियोजन यामुळे वीजपुरवठा सुरळीत झाल्याचे नागरिकांनी सांगितले. मळे परिसरासह शहरी भागालाही दिलासा मिळाला आहे. वीजपुरवठा म्हणजे आधुनिक काळातील ऑक्सिजन आहे, दर्जेदार सेवा देणे हे आमचे कर्तव्य आहे," असे घुमरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दत्ता ढेमसे, खंडेराव धोंगडे, तानाजी गवळी, मदन ढेमसे, दर्शन लड्डा, सुखदेव ढेमसे, संजय जाचक आदी उपस्थित होते.


आमच्यात सामील व्हा