बातमीपत्र

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी वर्षा निमित्त विनम्र आदरांजली.

श्री महालक्ष्मी माध्यमिक  विद्यालय आडोली  येथे सकाळी  १० वाजता १०० सेकंद स्तब्ध राहून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली.यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात आले,श्री शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री व्ही पी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .त्यानंतर इयत्ता 8 वी चे  विद्यार्थी दिग्विजय गावटे,अंकिता शिर्के आणि अपूर्वा मुगधे यांनी श्री शाहू महाराज यांच्या जीवनातील प्रसंग गोष्टी रुपात सांगितले.या विध्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री व्ही पी पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी शाळेचे सहायक शिक्षक श्री संपत मोहिते यांनी श्री राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला.
त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन  झाले.या कार्यक्रमास ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमच्यात सामील व्हा