बातमीपत्र

पूर तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी लक्ष्मी मातेच्या यात्रा तरुण तडफदार मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून समस्त ग्रामस्थ पूर यांच्या सहकार्याने यात्रा उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला.त्यावेळी यात्रेच्या निमित्ताने बैलगाडे,चोळी पातळ व दंडवत,त्याचप्रमाणे तमाशा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.पूर गावच्या समस्त ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या रूढी प्रमाणे कुलस्वामिनी यमाई देवीला चोळी पातळाचा मान ढोल लेझीम च्या गजरात दंडवत घेऊन यात्रेचा आनंद लुटला.त्यावेळी सनईवादक फकीरराव गायकवाड यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून यात्रेची शोभा वाढवली.पूर गावची समस्त ग्रामस्थ,पूर सप्ताह कमिटी,लक्ष्मी माता यात्रा उत्सव यांनी मोठ्या स्वरूपाचा कार्यक्रम करून समाजामध्ये एक नाव लैंकिकता निर्माण केले आहे.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा