समस्त ग्रामस्थ मंडळ कन्हेसर व दलित पॅंथर महाराष्ट्र यांच्या वतीने बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात साजरी सादर शर्यतीचे उद्घाटक माननीय श्री रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री,नम्रता गायकवाड सिने अभिनेत्री,युवा उद्योजक मा.श्री.शुभम सुखदेव सोनवणे,दलित पॅंथर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हि बैलगाडा शर्यत पार पडली.त्यावेळी कनेरसर गावचे प्रगतशील शेतकरी बाबाजी अर्जून दौंडकर,कैलास तबाजी घाडगे,हनुमंत रामराव दौंडकर माजी सरपंच,प्रशांत म्हसुडगे,सागर म्हसुडगे,भीमराव सोनवणे,एडवोकेट सुहास दौंडकर,बाबा हजारे तसेच मोहन दौंडकर माजी पोलीस पाटील व सर्व समस्त ग्रामस्थ कनेरसर बैलगाडा शर्यत चाहते उपस्थित होते.
