बातमीपत्र

राज्य शासनाच्या सर्व विभागाचा मुख्य कणा हा महसूल विभाग आहे. त्यामुळे या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे येथील अल्पभूधारक मागासवर्गीय शेतकरी श्री.शहाजी काशिनाथ सोनवणे व त्यांचे बंधू शंकर बाजीराव सोनवणे यांनी आपली शेती गट नंबर १६४ मौजे कनेसर येथील वडीलोपर्जित जमीन वर २००७ सालापासून एस.ई.झेड.प्रकल्प विकासित करण्यासाठी शिक्के टाकले आहेत ते काढण्यासाठी वारंवार शासनदरबारी हेलपाटे मारुनआजपर्यंत शासन दरबारी दाखल घेतली जात नाही व अल्पभूधारक मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या जमिनींवरील शिक्के काढाले नाहीत.ते शिक्के त्वरित काढावेत म्हणून शासनाकडे जोरदार मागणी केली आहे.शासन दरबारी पायपीट करण्याखेरीज कोणताही पर्याय सोनवणे कुटुंबाला उरला नाही.शासनाने आमची दखल घेऊन गट नंबर १६४ वरील शिक्के न काढल्यास हे शेतकरी भुमीहिन होऊन कुटुंब देशोधडीला लागल्या शिवाय राहणार नाही.तरी मायबाप सरकारने गांभीर्याने लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा अशी विनंती शहाजी काशिनाथ सोनवणे व त्यांच्या संपूर्ण परिवार ने केले आहे


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा