कोल्हापूर च्या रोटरी क्लब ऑफ गार्गी या संस्थेने या नवीन शैक्षणिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ परिसरात असणाऱ्या श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय आडोली, तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या शाळेतील सुमारे ८ ते १२ किलोमीटर अंतर चालत शाळेसाठी येणाऱ्या मुलींच्या साठी २७ सायकालींचे वितरण केले.वाकी घोल सारख्या दुर्गम व डोंगराळ परिसरात रोटरी क्लब ऑफ गार्गी पोहोचल्याने मुलींच्या शिक्षणाची फार मोठी सोय झाली आहे. वाकी घोल हा राधानगरी अभयारण्य मधील अतिशय दुर्गम भाग या भागात१२ वाड्या वस्त्या असून माध्यमिक शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय या शाळेत २७८ विद्यार्थी शिक्षण घेत असून सर्व विद्यार्थी दररोज ८ ते १२ किलोमीटर पायपीट करून शिक्षण घेत आहेत. घनदाट जंगल,रान गवे,अस्वल,साप अशा असंख्य जंगली प्राण्यांची भीती बाळगत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून संस्थेने सुसज्ज इमारत बांधली आहे.तसेच सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.कामते वाडी,हेळेवाडी,बागल वाडी या गावातून येणाऱ्या विद्यार्थिनी १२ किलोमीटर अंतरावरून शाळेत येतात.या विद्यार्थिनी साठी संस्थेचे संचालक श्री.अमेय अतुल जोशी यांच्या प्रयत्नातुन रोटरी क्लब ऑफ गार्गी यांच्या वतीने २७ सायकली चे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमात रोटरी च्या प्रेसिडेंट सौ.दीपिका कुंभोजकर,सेक्रेटरी सौ.अनघा पेंढारकर,सौ मेघा शेळके,सौ. योगिता कुलकर्णी तसेच सौ.स्मिता कांबळे,सौ.वैशाली कांबळे यांच्या हस्ते सायकल प्रदान करण्यात आल्या.उपस्थित सर्वांचे मुख्याध्यापक श्री विद्यानंद पाटील सर यांनी स्वागत केले तर आभार श्री.अमेय अतुल जोशी यांनी मानले.
