इचलकरंजी च्या रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी या संस्थेने या नवीन शैक्षणिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ परिसरात असणाऱ्या श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय आडोली,तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या शाळेतील सुमारे ८ ते १२ किलोमीटर अंतरावरून चालत शाळेसाठी येणाऱ्या मुलींसाठी १८ सायकालीचे वितरण केले.वाकी घोल सारख्या दुर्गम व डोंगराळ परिसरात रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी पोहोचल्याने मुलींच्या शिक्षणाची फार मोठी सोय झाली आहे. वाकी घोल हा राधानगरी अभयारण्य मधील अतिशय दुर्गम भाग. या भागात12 वाड्या वस्त्या असून माध्यमिक शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय. या शाळेत २८१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.कामते वाडी,हेळे वाडी,बागल वाडी या गावातून येणाऱ्या विद्यार्थिनी १२ किलोमीटर अंतरावरून शाळेत येतात. शाळेचे मुख्याध्यापक विद्यानंद पाटील सर यांच्या प्रयत्नातुन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने १८ सायकली चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात रोटरी चे प्रेसिडेंट श्री.सत्यनारायण धुत आणि पदाधिकारी श्री रवींद्र नाकील,श्री प्रकाश रावळ,श्री वसंतराव पाटील,गुरुनाथ कुलकर्णी यांच्या हस्ते सायकल प्रदान करण्यात आल्या.उपस्थित सर्वांचे स्वागत मुख्याध्यापक श्री विद्यानंद पाटील सर यांनी केले तर आभार श्री संपत मोहिते सर यांनी मानले.
