बातमीपत्र

जय भिम नगर इचलकरंजी येथे सम्यक विद्यार्थी आंदोलन व युवा वर्गाच्या वतीने छ. शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी गौतम बुद्ध ,छ. शिवाजी महाराज,मा. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या फोटो पुजन - पुष्पहार अर्पण करण्यात आले , या वेळी महापुरुषांच्या विचारांवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करून समाजात परीवर्तन करणे आवश्यक आहे त्यासाठी सुरवात आपल्या पासून करण्यात यावी, जातीच्या नावावर तेढ निर्माण करणार्या पासुन सावधान असले पाहिजे असे आवाहन करण्यात आले. या वेळी उपस्थित युवा नेते अमर पारडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे इचलकरंजी शहराध्यक्ष तुळशीदास टेकाळे, संदिप माने, गणेश ताकपिरे, मनोज चंदनशिवे,शाखानंद कांबळे,अजिम पठाण, राहुल दनाने,सागर चौधरी, विशाल शिंदे, संदिप चौधरी अविनाश टेकाळे, कृष्णा गायकवाड, आकाश चौधरी,अजय लोंढे, रोहित पालके, राहुल, चव्हाण, मयुरी टेकाळे,जानवी काळे, तसेच मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक, विद्यार्थी-पालक वर्ग उपस्थित होते.


आमच्यात सामील व्हा