बातमीपत्र

लोणार पासुन तिन किलोमिटर अंतरांवर असलेल्या पिंपळखुटा गावात सत्यभामाबाई प्रकाश घनवट ह्या आपली मुलगी प्रेरणा माधव रसाळ हीच्या सह राहतात आज रोजी दोन्ही मायलकी नेहमी प्रमाणे मोलमजूरीसाठी शेतात गेल्या होत्या मात्र प्रेरणा ची दोन चिमुकली मुल १ ) ज्ञानेश्वर माधव रसाळ वय ७ वर्ष २) काजल माधव रसाळ वय ५ वर्ष ही दोन्ही चिमुकली दोन्हा भाऊ बहीण घरात खेळत असताणा अचानक घरगुती स्वपाकाच्या गॅस चा स्फोट झाल्याने घरातुन आगीचे लोळ पडू लागले या महाकाय आगीत भाऊ -बहीण अक्षरक्षा जळूण खाक झाली . या वेळी घरातील संसार उपयोगी साहीत्याचा पुर्णता कोळसा झाला . घटणेची माहीती मिळताच लोणार तहसीलचे ना. तहसीलदार हेमंत पाटील , सहाय्यक गटविकास अधिकारी रविद्र मापारी तलाठी , मंडळअधिकारी यांणी घटस्थळाला भेट देत तात्काळ सानुग्र मदत जाहीर केली . सत्यभामाबाई मोलमजुरी करूण आपले कुट्ब चालवत होती तर मागील ५वर्षा पासुन मुलगी प्रेरणा सुध्दा माहेरी आईजवळच आपल्या चिमुक्ल्या सह राहत होती .आशातच नियतीने असा डाव खेळल्याने पुर्ण होत्याचे नवते झाले ! अन प्रेरणा ची दोन्ही मुलांचा हया आगीत अंत झाला व पुर्ण कुटूबंच उघडयावर आल्याने . मदतीची अपेक्षा व्यक्त आहे .


आमच्यात सामील व्हा