लोणार तालुक्यामधील शिवणी पिसा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून याठिकाणी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी कुटुंब कल्याण शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र सांगळे यांनी अकरा महिलांची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली संबंधित आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा स्टाफ नसून व वाडबॉय सुद्धा नाही,पाण्याची व्यवस्था नाही,साफसफाईची व्यवस्था नाही व पेशंटला अल्पोपहारची व्यवस्था दवाखान्या मध्ये होत नाही व एक ॲम्बुलन्स आहे पण ॲम्बुलन्स ला चालक नाही अशी दयनीय परिस्थिती असल्याने जिल्हापरिषद सदस्य दिलीप वाघ व सरपंच विकास पिसे यांना सांगितले असता त्यांनी एक एमबीबीएस डॉक्टर व ॲम्बुलन्स शिवनी पिसा येथे ऊपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणली त्या नंतर गावकऱ्यांनी आरोग्य केंद्राला कुलुप ठोकले.
