बातमीपत्र

लोणार तालुक्यातील हत्ता येथील रामलाल झिपा चव्हाण या बंजारा शेतकऱ्याच्या देशी गाईने तीन वासरांना जन्म दिला आहे. यात दोन गोऱ्हे व एक काऱ्हवड असून वासरे धडधाकट आहेत. एकाच वेळी तीन वासरांना गाईने जन्म देणे ही लाखात एखादीच घटना घडते.लोणार तालुक्यातील हत्ता येथील रामलाल चव्हाण हे अल्पभूधारक शेतकरी. आपल्या कुटुंबासह शेतात राहतात. मुलाबाळांना घरचे दूध मिळावे म्हणून त्यांनी एक देशी गाय विकत घेतली. त्या गायीने पहिल्या वेतीस एक काऱ्हवडीला जन्म दिली होती. परंतु दुसऱ्या वेतीस या गाईने दिनांक 4 मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी तीन वासरांना नैसर्गिक रित्या जन्म दिला. आज पर्यंत गाईने दोन वासरांना जन्म दिल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र तीन वासरांना जन्म देण्याची ही तालुक्यातील पहिलीच घटना असल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरत आहे.


आमच्यात सामील व्हा