राधानगरी ते वाकीघोल रस्त्यावर चाफोडी जवळ बाबळीचे झाड रस्त्यावर उन्मळून पडल्याने मार्ग बंद हे पाहताच तसिलदार कार्यालयाचे लिपिक रणजित ढोकरे,ST चालक,वाहक व सर्व प्रवाशानी हा मार्ग मोकळा केला. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे रस्त्या त खड्डे पडल्याने गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा गेली ७० ते ७५ वर्ष झाली या कडे शासनाचे लक्ष नाही या मुळे ग्रामस्थांना याचा वारंवार त्रास होत आहे पंचायत समितीच्या माध्यमातून वारंवार प्रयत्न करूनही या कडे शासन दुर्लक्ष करत आहे असे सभापती दिलीप कांबळे यांनी निदर्शनास आणले.तसेच पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी या रस्त्याकडे लक्ष घालून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी पंचायत समितीचे सभापती दिलीप कांबळे यांनी केली.
