बातमीपत्र

भुदरगड तालुक्यातील मधील एरडपे ते रक्षादेवी येथील बाक्साईट जवळ कमीतकमी ५०×५० इतका रस्ता वाहून गेल्यामुळे वाकीघोलातील नागरिकांना फारमोट्या संकटाना सामोरे जावे लागत आहे दररोज वाकीघोलातील दुध अंदाजे पाच हजार ते सहा हजार लिटर उत्पादनाचे नुकसान होत आहे.त्याच बरोबर संपूर्ण वाकीघोलातील १० हजार पेक्षा जास्त लोककसंख्येचा विभागातील नागरिकांचा संपूर्ण संपर्क बंद झाला.वाकीघोलात गेली ९ ते १० दिवस लाईटची सोय नसल्याने अंधारमय जीवन येथील लोकांना जगावे लागत आहे.वाकीघोलात दळणवळणाचा दुसरा कोणत्या ही पर्याय नसल्याने लवकरात लवकर रस्त्याचे काम लवकरात लवकर करून शासनाने दळणवळणाची सोय करावी असे स्थानिक नागरिक मागणी करत आहेत या सर्व गोष्टींचा काय परिणाम होत आहे हे जाणून घेऊया आपल्या सोबत गावकरी राजु ढोकरे,केरबा पाटील,बबन ढोकरे ग्रा.पंचायत सदस्य आडोली,किरण ढोकरे,अरविंद नाईक,माजी सरपंच सावर्दे,दिपक नाईक,सागर ढोकरे,अनिकेत ढोकरे


आमच्यात सामील व्हा