बातमीपत्र

भाजपाचे तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील व मौनी विद्यापीठाचे सदस्य अलकेश कांदळकर यांनी या गावच्या पाणी योजनेचे पाणी सुरू होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याचा घेतला निर्णय

गारगोटी दि. १५
शेणगांव ता. भूदरगड येथे पूरामुळे प्रचंड हाणी झाली आहे. अनेक घरे जमिनदोस्त झाली तर अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली.
     पूराच्या पाण्यामूळे नदीकाठी असणाऱ्या सार्वजनिक पाणी पूरवठा योजनेलाही फटका बसला या योजनेच्या जॅकवेला पूराच्या पाण्याने वेढा दिल्याने पाणी पूरवठा करणाऱ्या विद्युत मोटारी पूर्णत : बंद होत्या तसेच या ठिकाणचा विद्यूत पूरवठा देखिल बंद असल्यामूळे गावाला पाणीपूरठा करणारी योजना बंद झाल्यामूळे गावाला पाणी मिळणे अडचणीचे झाले होते.
      याची दखल घेऊन भाजपाचे तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील व मौनी विद्यापीठाचे सदस्य अलकेश कांदळकर यांनी या गावच्या पाणी योजनेचे पाणी सुरू होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
     भाजपाचे तालुका सरचिटणीस व संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सुनिल तेली व स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी या टँकरद्वारे पाणीपूरवठ्याचे योग्य नियोजनगावामध्ये केले...
    यामूळे शेणगांव येथील नागरिक व महीला भगिनी यांच्यात समाधान पसरले आहे.


आमच्यात सामील व्हा