केळोशी खू॥,पिपऱ्याची वाडी,तळगाव भागात भुसख्यलनाची पाहणी करताना पंचायत समिती राधानगरी सभापती श्री.दिलीप कांबळे,सोबत पंचायत समिती सदस्या सौ.दिपाली दिपक पाटील,सौ.वंदना विलास हळदे ,गावचे डे .सरपंच,ग्रामसेवक व सर्व ग्रामस्थ,राधानगरी तालुक्यामध्ये बऱ्याच भागात जमिनीमध्ये आश्चर्यकार्यरित्या,अचानक बदल होऊन भेगा पडणे,भुसख्यलन सारखे प्रकार वारंवार घडत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे,गेली आठ दिवस हा प्रकार घडूनसुद्धा अजून भूगर्भशास्त्राचे अधिकारी तिथे आले नाहीत त्याबदल सभापतींनी खंत व्यक्त केली.राधानगरी तालुका हा दुर्गम डोंगराळ व पावसाचा तालुका असून डोंगराळ भागात लोकांनी अशा परिस्थीत जावू नये असे आवाहनही सभापतींनी केले,जिल्हाधिकारी कार्यालय व भूगर्भशास्त्राचे अधिकारी यांना पाहणी करणेसाठी आपण विनंती करू व झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून ज्या त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळावा ह्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी सभापती यांनी दिले.
