रिसोड तालुक्यातील नेतंसा येथे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे सदर शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक म्हणून ज्वारी,मुंग,उडीद व मका यासारख्या पिकांची पेरणी करून सर्व पिके काढणीस आल्यावर तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचे आगमन झाले व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.कोरोना या आजारामुळे सर्व खेड्यापाड्यातील शेतकरी वर्ग हवालदिल झालेला असताना या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
झाल्याने सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना खरीप हंगामा करता शासनाने मदत करावी अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.
