बातमीपत्र

सभापती विश्वनाथजी सानप यांची जिल्हा परिषद शाळा चिचांबा भर ला आढावा भेट

प्रतिनिधी - वाशिम जिल्ह्याचे कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री.विश्वनाथजी सानप यांनी दिवाळी दिपोत्सव, सुरक्षित दिवाळी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शाळा व्यवस्थापन समिती सोबत चर्चा,विद्यार्थी-पालक-शिक्षक-गावकरी सोबत चर्चा, विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच रुबेला जनजागृती याविषयी चिचांबा भर जिल्हा परिषद मराठी शाळेला आढावा भेट दिली. दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांशी त्यांचा पालकांशी  संवाद साधला या दिवाळीचा सुट्टीत विद्यार्थ्यांना सुरक्षित दिवाळी कशी साजरी करावी याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच रुबेला लस बदल माहिती दिली त्या रोगाबद्दल घ्यावयाची काळजी आणि उपलब्ध असणाऱ्या लस बद्दल मार्गदर्शन केले.त्यानंतर सभापती विश्वनाथजी सानप यांनी शाळा व्यवस्थापन समिती तसेच शिक्षक मंडळी सोबत चर्चा करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती बदल चर्चा केली.तसेच शाळेतील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.या कार्यक्रमाला विश्वनाथजी सानप साहेब सभापती कृषी व पशुसंवर्धन जि. प.वाशिम तसेच माजी सरपंच दिनकरराव सानप, नामदेवराव सानप तसेच सर्व ग्राम पंचायत सदस्य,शिक्षक,गावकरी मंडळी तसेच विध्यार्थी उपस्थित होते.

Follow Us On Social Media 
Web Site : -  www.livemaharashtra.com 
Download Live Maharashtra App From Google Play store 
 
आपल्या सर्वांच्या सामाजिक,राजकीय आणि सत्य बातम्याचा लक्षवेधी आढावा व प्रत्येक अनुचित घडणाऱ्या घटना आपल्या समोर मांडणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी Live महाराष्ट्र.  
पाहत राहा Live महाराष्ट्र - हाक तुमची !! साथ आमची !!


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा