बाबा रामदेवजी को-ऑप हौ.सो. या इमारतीमध्ये 15ऑगष्ट २०२० स्वतंत्र दिन अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला याप्रसंगी श्री.गिते साहेब API वडाळा टि.टि.पोलिस ठाणे आणि श्री. रामदासजी कांबळे नगरसेवक प्रभाग क्र.173,प्रतिक्षानगर,श्री.डॉ.सुभाष गोस्वामी साहेब,श्री.प्रवीण प्रजापती यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहण समारंभ श्री.गिते साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला सर्व रहिवाशांतर्फे राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शालांत व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेचअत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांचा सत्कार सन्मानपत्र देऊन व जेष्ठ नागरिकांना शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.हस्ताक्षर स्पर्धा व चित्रकला स्पर्धा (लहान गट व मोठा गट) विजेते स्पर्धक व सहभागी स्पर्धक यांचा पारितोषिक वितरण सोहळाही पार पडला.याप्रसंगी इमारतीतील सर्व उपस्थित रहिवाशांमध्ये,विद्यार्थ्यामध्ये,सर्व महिला वर्गामध्ये,जेष्ठ नागरिकांमध्ये हर्षोल्लासाचे वातावरण होते.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करणारे सर्व कमिटी सदस्यांनी गेलेल्या सात-आठ दिवस अविरत मेहनत घेतली.श्री.विजय गं जाधव,श्री.मिलिंद पगारे,श्री.एकनाथ सोनवणे यांचे सर्व कार्यक्रमाच्या नियोजनात मार्गदर्शन व सक्रिय सहभाग लाभला. श्री.अजय खंडागळे (उपाध्यक्ष) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले श्री. मिलिंद जाधव अध्यक्ष,श्री.उमेश जाधव-सेक्रेटरी,श्री. प्रकाश गिलातर-खजिनदार,श्री.सुधीर आंग्रे,श्री.श्रीनिवास चाटला,श्री.नांदगावकर,श्री.परमार यांनी आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली. या सर्वाच्या मेहनतीमुळेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
