बातमीपत्र

हेलपिंग हॅन्ड फौंडेशन एक हात मदतीचा या संस्थेच्या नवी मुंबई विभागाच्या वतीने दिनांक ४.१०.२०१९ रोजी ऐरोली ऑफिस येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये प्रामुख्याने आरोग्य जीवन ज्योती महाभियानांतर्गत मोफत एन्जोग्राफी, एन्जोप्लास्टी, बायपास सर्जरी,मोफत मोतीबिंदू ऑपरेशन सारखे उपक्रम राबवण्यात आले यावेळी डोळे तपासणी,रक्तदाब तपासणी(ब्लड प्रेशर),डायबिटीस तपासणी व इतर किरकोळ तपासण्या घेऊन मोफत औषध देण्यात आले व योग्य मार्गदर्शन तज्ञ् डॉक्टरांच्या माध्यमातून करण्यात आले.सदर कार्यक्रमाला संस्कार सेवा संस्था व कल्याणी जैन सेवाभावी संस्थेचा हातभार लागल्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमासाठी हेलपिंग हॅन्ड फौंडेशन एनजीओ चे संस्थापक/अध्यक्ष अनिल कांबळे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा वनिता त्रिंबके,मुंबई उपाध्यक्ष संदेश थिट्टे,नवी मुंबई अध्यक्षा उल्फात पठाण,उपाध्यक्षा स्वरूप नारायणदास,सचिव ऋतुजा नाईक व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


आमच्यात सामील व्हा