प्रतिनिधी - काल रमेश सोळंकी या ठेकेदारासोबत झालेल्या संभाषणाची कथित क्लिप व्हायरल झाल्यानंतर काही काळाकरता निर्माण झालेला संभ्रम आज स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव स्वतः पत्रकार परिषद घेऊन दूर केला. सदर पत्रकार परिषदेमध्ये यशवंत जाधव यांनी अनेक गुपिते उघड केली असून त्यामुळे अनेक जणांचे पितळ उघडे पडेल असा दावा केला आहे. व्हायरल झालेली क्लिप हि अर्धवट असून मुलुंड मध्ये टी वार्ड मध्ये केलेल्या नित्कृष्ट कामामुळे मे यश कॉर्पोरेशन ह्या ठेकेदारास भायखळ्यामधे ई विभागात काम करायचे असेल तर ते गुणवत्ता आणि मेरिट यांच्या निकषावरच करावे लागेल आणि तसे जमणार नसल्यास तुम्ही ई विभागात कार्य करू नका हे संभाषण जाणीवपूर्वक कापून उरलेला भाग महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि ई विभागातील कर्मचारी यांना बदनाम करण्याच्या दृष्टीने प्रसारित केला असल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले. सदरचे षडयंत्र विरोधकांनी रचले असून त्यामागील खरा सूत्रधार लवकरच पडद्यासमोर आणेन असा दावा यशवंत जाधव यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय असलेले यशवंत जाधव यांची प्रतिमा डागाळण्याचा डाव यशवंत जाधव यांनी अतिशय चाणाक्षपणे उधळून लावला. यामागे त्यांच्याच पक्षातील काही स्वकीय शत्रूंचा हात आहे का असे विचारले तेव्हा यशवंत जाधव यांनी योग्य वेळेस सर्व नावे आपल्या समोर खुली करेन असे अतिशय आत्मविश्वासाने सांगितले. एकंदरीतच पत्नी आमदार यामिनी जाधव, मुलगा सिनेट सदस्य निखिल जाधव आणि स्वतः स्थायी समिती अध्यक्ष अशी यशवंत जाधव यांची यशस्वी राजकीय कारकीर्द विरोधकांना रुचली नसल्याने गनिमी काव्याने त्यांना आव्हान निर्माण करण्याचे काम विभागात सुरु असल्याचे सूत्रांकडून समजले. परंतु यशवंत जाधव हे फक्त किंग नाहीत तर ते किंग मेकर पण आहेत आणि ह्यावेळी मुंबईमध्ये ४ प्रभाग समिती अध्यक्ष अधिकचे निवडून आणल्याने त्यांचे राजकीय प्रस्थ अधिकच मजबूत झाले आहे असे सूत्रांकडून समजते. क्लिपची तोडमोड करून कथित अर्धवट क्लिप व्हायरल करून त्याबाबतचे अधिक सत्य जनतेपुढे मांडण्यासाठी यशवंत जाधव यांनी सहायक आयुक्त ई विभाग यांना अधिक तपास करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
