बातमीपत्र

समाजसेविका सौ.अश्विनी अमोल केंद्रे याचे SRPF जवानांसाठी आमरण उपोषण,मा.मुख्यमंत्री यांनी जिल्हा बदलीचा नियम १५ वर्षाहून १० वर्ष करावा तरच उपोषण मागे घेण्यावर समाजसेविका सौ.अश्विनी केंद्रे ठाम एक किडनी असूनही समाजसेविका सौ.अश्विनी अमोल केंद्रे SRPF जवानांची जिल्हा बदली १० वर्ष करण्यासाठी गेल्या १४ दिवसा पासून राहत्या घरीच आमरण उपोषण करत आहेत.8 मार्च 2019 रोजी आजाद मैदान येथे उपोषण केले,1 डिसेंबर 2020 एकूण 9 सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक केली तरीही दिलेला शब्द पाळत मुंडण करून निषेध केला व 7 डिसेंबरला मुंडण केलेले केस पाठवले.26 डिसेंबरला आमरण उपोषणला सहकार्य करून SRPF जवान व महाराष्ट्र पोलिसांना न्याय देण्यासाठी देशाचे मा.राष्ट्रपती,मा.पंतप्रधान,केंद्रीय गृहमंत्री, 48खासदार, 288पैकी२४४आमदार,वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर साहेब,मनसे अध्यक्ष राज ठाकरे,समाजसेवक अण्णा हजारे,समाजसेवक नितीन नांदगावकर साहेब,समाजसेविका मेघा पाटकर यांना ठाणे येथील पोस्टाने निवेदन पाठवले.1 जानेवारी 2021 ला वचन नाम्याचे श्राद्ध घातले आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणास बसण्यास पोलिसांनी हरकत घेतल्याने दिवा येथे राहत्या घरीच आंदोलन सुरु केले याची दाखल घेत उपोषणाच्या 8 व्या दिवशी विधानसभेचे अध्यक्ष माननीय श्री नाना पटोले यांनी दिनांक 02/02/2021 रोजी विधान भवन येथे बैठक आयोजित केली या बैठकीला SRPF च्या ADG अर्चना त्यागी मॅडम व समाजसेवक अमोल केंद्रे उपस्थित होते.तेथे आमरण उपोषण सोडा असे सांगण्यात आले परंतु जोपर्यंत जिल्हा बदली 10 वर्ष होत नाही तो पर्यंत उपोषण सोडले जाणार नाहीअसे ठाम मत समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी मांडले त्यावर विधानसभा अध्यक्ष मा.श्री नाना पटोले यांनी 100% मार्ग काढतो असे आश्वासन दिले.अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही सौ.अश्विनी केंद्रे यांच्या उपोषणाला सर्वच थरातून प्रतिसाद मिळत आहे तरी मुख्यमंत्री मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लवकर यावर मार्ग काढावा असे यावेळी सांगण्यात आले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा