बातमीपत्र

खेड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक १५ /०३ /२०२१ रोजी वाजता 2.४५ च्या सुमारास मौजे राजगुरुनगर गावच्या हद्दीत फिर्यादी यांच्या राहत्या घरी आरोपी संदिप भरत ढमाले वय वर्ष - ३८ राहणार माणिक लाॅज शेजारी नागोबा मंदिराजवळ रविवार पेठ पुणे याने फिर्यादी यांची पिडीत मुलगी ती अल्पवयीन आहे,हे माहीती असताना देखील तिला चॉकलेट खायला देवून तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले व कोणाला काही सांगितले तर तुला जीवे मारून टाकेन अशी धमकी देऊन व तेथून पसार झाला.खेड पोलीस ठाणे गुन्हेशोध पथकाला बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील आरोपी पुणे येथे येणार असल्याची बातमी मिळताच पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे पोलीस अंमलदार सचिन जतकर,शेखर भोईर,निखिल गिरीगोसावी,स्वप्निल गाढवे,योगेश भंडारे यांनी सापळा रचून पुणे-सिंहगड जाणाऱ्या रोडवर भुमकर नगर पुलाच्या खाली उभा असताना २८ /०५ /२०२१ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास त्याची चौकशी करून त्याला ताब्यात घेऊन त्यांस अटक करण्यात आली.सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक-अभिनव देशमुख साहेब,मा.अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील साहेब,मा. उपविभागीय पोलीस अधीक्षक अनिल लंभाते साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास म.पो.स.ई.घाटे सो.हे करत आहेत.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा