पुणे - माळशेज घाटात आज पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून येथील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महामार्ग अधिकारी कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी पोहोचले आहेत. दरम्यान, सध्या घाटात खूप धुके असून त्याचा अंदाज घेऊन दरड हटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली.
