रयत क्रांती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, संघटनेस सेझ बाधित शेतकऱ्यांचे दिनांक २० एप्रिल 20२१रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविलेले निवेदन मिळाले.त्यानुसार संघटनेच्या वतीने सेझ बाधीत शेतकऱ्यांशी चर्चा करून या प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी संघटनेने पाठिंबा जाहीर केला.संघटनेच्या वतीने सेझ बाधित शेतकऱ्यांचा 15 टक्के परतावा हा प्रश्न त्वरित सोडविण्यास संदर्भात कार्यवाही व्हावी. यासंदर्भातील निवेदन ५ जून२०२१ रोजी माननीय मुख्यमंत्री, उद्योग मंत्री,यांना देण्यात आले आहे. निवेदन देऊनही प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.सेझ बाधित शेतकऱ्यांचा पंधरा टक्के परताव्याचा प्रश्न गेली १२ वर्ष प्रलंबित असून त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने करून व निवेदन देऊनही त्यांना न्याय मिळाला नाही.450 भागधारकाचे अंदाजे पंचावन्न कोटी रूपये एवढी आगाऊ रक्कम जमीन संपादनाच्या वेळेस कपात करण्यात आली .असून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पंधरा टक्के परतावा मिळाला नाही.याबाबत सेझबाधित शेतकऱ्यांची आशी भूमिका आहे की शासनाच्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्यामार्फत शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले आहे त्यामुळे हा प्रश्न शासकीय पातळीवर सोडविला जावा. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग मंत्री, एमआयडीसीमुख्य कार्यकारी अधिकारी, केईआयपीएल प्रतिनिधी, सेझ बाधित शेतकरी प्रतिनिधी, यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा. बाधित शेतकऱ्यांना रोख स्वरूपात परतावा मिळावा अशी भूमिका आहे.सेझ बाधित शेतकऱ्यांच्या पंधरा टक्के परतावाया प्रश्नाला रयत क्रांतीशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य,यांचा पाठिंबा असून शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी यापुढे संघटना तीव्र आंदोलन सेझ बाधित शेतकऱ्यांना समवेत घेऊन करणार आहे. हा प्रश्न पूर्ण सुटे पर्यंत संघटना सेझबाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभी राहणार असून त्यांना त्यांचा न्याय मिळवून देणार आहे. असे रयत क्रांतीशेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते मा. श्री. गजाननराव गांडेकर इतर पदाधिकारी यांनी जाहीर केले.रयत क्रांती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व संस्थापक मा .श्री .नामदार सदाभाऊ खोत (कृषी राज्य मंत्री)यांच्या पर्यंत सेझ बाधित शेतकऱ्यांचा 15 टक्के परताव्याचा प्रश्न पोहोचविला असून त्यांच्याशी चर्चा केली आहे.लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर यासंदर्भात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे नियोजन आहे. जर निवेदन देऊनही प्रश्न सुटला नाही तर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष/संस्थापक मा. श्री .सदाभाऊ खोत साहेब यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल .असे रयत क्रांती शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र, प्रदेश प्रवक्ते मा.श्री. गजानन राव गाडेकर यांनी सांगितले.रयत क्रांतीशेतकरी संघटनामहाराष्ट्र राज्य ,यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी बाधित शेतकऱ्यांच्या वतीने प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे. ॲड. महेश गोगावले,काशिनाथ हजारे. नंदकुमार नेटके , धरमचंद छाजेड, विजय कुमार भालेकर, प्रा. अविनाश दौंडकर, शिवाजी भांबुरे आप्पाजी हजारेयांनी विशेष प्रयत्न केले.
