मराठी हृदय सम्राट मा. राजसाहेब ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत आहेत. सध्या संपूर्ण जागत कोरोना या महामारीने जनसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले असून आरोग्याच्या समस्यांनी डोके वर काढले आहे व ठिकठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे अशातच रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने मनसे घाटकोपर विधानसभेच्या वतीने आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री अप्पा मोहिते यांनी केले कार्यक्रमाचे उदघाटन मनसे नेते श्री.शिरीष सावंत,सरचिटणीस श्री. राजाभाऊ चौगुले,सौ.रिटा ताई गुप्ता या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत झाले.यावेळी घाटकोपर पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष श्री.रमेश खाडये,महीला विभाग अध्यक्षा सौ.कविता राणे,उपविभाग अध्यक्ष श्री.प्रशांत कुलकर्णी, रस्ते साधन सुविधा उपाध्यक्ष श्री.बाबासाहेब अवघडे,सौ.लता दळवी,सौ.प्रतीक्षा गवंडी,शाखा अध्यक्ष श्री.कुणाल केदारे,श्री.अभिजित शेजवळ,सौ.सोनल पांचाळ,सौ. शलाका बने,सौ.उज्वला मोरे,सौ.रेश्मा मांडवकर उपस्थित होते.
