पुतण्याला पैशाची गरज लागली तर चुलत्याने गहाण साठेखत करून जमीनच गिळून टाकली असा प्रकार शिरूर तालुक्यातील हिवरे कुभांर येथे घडला संतोष झेंडे हे नोकरी निम्मित मुंबई येथे राहतात यांची वडिलोपार्जित जमीन हिरवे कुंभार या गावी आहे त्यांचे चुलते एकनाथ झेंडे यांनी साठेखत बनवून ती जमीन बळकावली,आर्थिक परिस्थिती खराब असल्याने मदत मागितली असता साठेखत करून जमीन स्वतःच्या ताब्यात ठेवली गेली १६ वर्ष जमिनीत पीक घेतले त्यामुळे मनात लालच निर्माण झाल्याने पुतण्याने त्यांना घेतलेले पैसे परत करतो पण आमची जमीन परत दे असे सांगितले परंतु स्थानिक पातळीवर ओळखीच्या जीवावर जमीन परत न करता त्यावर अतिक्रमण करणाऱ्या चुलत्यावर कायदेशीर कारवाई करून न्याय मिळावा अशी अपेक्षा संतोष झेंडे यांनी यावेळी व्यक्त केली.
