बातमीपत्र

भांडुप कांजूर विक्रोळी मधील विकासकामांना मिळणार गती !

करोनाच्या पार्श्वभूमीवर भांडूप कांजुरमार्ग विक्रोळी मधील प्रलंबित असलेली विकास कामे तसेच लोकोपयोगी प्रकल्पांना आता गती मिळणार आहे. विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनील राऊत यांनी महापालिका आयुक्तां बरोबर बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली.या वेळी मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आले. विक्रोळी मतदार संघातील काही प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी आमदार सुनील राऊत यांनी मनपा उपायुक्त यांची घाटकोपर येथील उपायुक्त परिमंडळ 6 कार्यालयामध्ये एक बैठक आयोजित करुन सविस्तर चर्चाही केली.सदर बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे कळते.

विक्रोळी मतदारसंघ अधिक समृद्ध, विकसित करण्यासाठी मतदारसंघातील भांडूप (पूर्व) बापुसाहेब जुवेकर भुखंडावर रूग्णालय (मॅटरनिटी होम) तत्काळ सुरू करणेबाबत.कांजुर येथील रुणवाल ब्लीस या गृहप्रकल्पातील ॲंमिनिटी प्लॅाटवर गार्डन बांधणेबाबत.भांडूप पूर्व - भांडूप पश्चिम जोडणारा उड्डाणपूल बांधणेबाबत,पूर्व द्रुतगती महामार्गालगत अतिक्रमणमुक्त झालेल्या जागेवर अद्ययावत उद्यान बांधणेबाबत. कांजुरमार्ग (पूर्व) येथील एकविरा नगर, मोहटादेवी, हनुमाननगर, ट्राली लाईन येथे पाणी वाहून जाण्यासाठी मोठा नाला बांधणेबाबत.पवई, मोरारजी नगर येथील रस्ता रुंदीकरणातील बाधितांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी करणेबाबत.तसेचविक्रोळी (पूर्व) रेल्वे स्थानक ते मास्टर पॅलेस पर्यंत नामदेव पाटणे रस्त्याचे रुंदीकरण करण्याबाबत व परेश पारकर रस्त्याचे रुंदीकरण करण्याबाबत. वरील सर्व निर्णयाची लवकरात लवकर अमंलबजावणी करण्यासाठी  पालिका प्रशासनाने आमदार सुनील राऊत यांना आश्वासीत केल्याचे सांगितले.


साप्ताहिक बातम्या

आमच्यात सामील व्हा