बातमीपत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन

१४ जून रोजी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तभांडुप विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक ११० मधील ज्येष्ठ नागरिक व महिलांना शाखा अध्यक्ष मोहन चिराथ यांच्या वतीने मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 राजगड ११० कार्यालय, कुकरेजा कॉम्प्लेक्स, व्हीलेज रोड, भांडुप पश्चिम, सायंकाळी ५.०० ते ७.०० यावेळत सदय कार्यक्रम हाती घेतला आहे.सदर कार्यक्रम हा फक्त प्रभाग क्रमांक ११० पुरता मर्यादित असून कूपन घेणे आवश्यक आहे. कूपन १० व ११ जून रोजी सायंकाळी राजगड ११० कार्यालयात वाटप करण्यात येणार आहे.  शिधापत्रिका सोबत आणणे गरजेचे आहे.असे शाखाध्यक्ष मोहन चिराथ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


आमच्यात सामील व्हा