बातमीपत्र

बिबी येथे नागपूर-मुंबई हायवेवर असलेल्या चंद्रकला हाईट कॉम्प्लेक्समध्ये दिनांक ४ जूनच्या मध्यरात्री झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपींना बिबी पोलिसांनी चिखली येथून अटक केली.पवन बद्रीनाथ गुलमोर,संतोष कापकर व भागवत ईवरे हे चंद्रकला हाईट कॉम्प्लेक्सच्या ऑफस मध्ये झोपलेले असतांना दि.६ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील मोबाइल व नगदी रक्कम असे एकूण ४१ हजार ५०० रुपये चोरून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला पवन बद्रीनाथ गुलमोर यांनी दिली.त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान बिबी पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार एल.डि.तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला.चोरी प्रकरणातील मोबाईलचे कनेक्शन नागपूर येथे मिळून आल्याने बिबी पोलिसांनी तेथून एका आरोपीस ताब्यात घेतले.चौकशी दरम्यान चोरीचे मुख्य सूत्रधार हे चिखली याठिकाणी असल्याचे समजले सौरभ कुसुंबी,स्वप्नील ताकफळे,विशाल दांडगे,राहुल गजानन व एक विधिसंघर्षग्रस्त बालक सर्व राहणार चिखली यांना अटक केली असता त्यांनी अंठेरा फाट्यावर नशापाणी करून सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल व चोरी प्रकरणात वापरण्यात आलेल्या दोन मोटरसायकली असा १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपी कडून जप्त केला आहे.सदर आरोपींवर चिखली याठिकाणी जबर चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत.अटक केलेल्या आरोपी विरोधात पाच दिवसाचा पीसीआर मिळाला असून आरोपीकडून अजून चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.तसेच परिसरातून कोणाचे मोबाईल चोरी गेलेले असल्यास त्यांनी बीबी पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधण्याचे आवहान पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.


आमच्यात सामील व्हा