बातमीपत्र

कोरोना महामारी लॉक डाऊन,बोगस बियाणे,अतिवृष्टीची मदत व पीक विम्याची रक्कम न मिळाल्याने तसेच जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असतांना यावर्षी पेरणी कशी करावी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील भुमराळा शिवारात शेतकरी तथा स्वाभिमानी शेतकरी संघटना लोणार तालूका अध्यक्ष अनिल मोरे यांच्या शेतात दगडाची पेरणी करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.यावेळी बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड,लोणार तालुका अध्यक्ष अनिल मोरे,तालुका उपाध्यक्ष अनिल लांडगे,शेतकरी अशोक मोरे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.


आमच्यात सामील व्हा