हेल्थकेअर व्यावसायिकांचे कठोर परिश्रम,विचारशीलता आणि या आव्हानात्मक काळात वचनबद्धतेसाठी राष्ट्र त्यांचे ऋणी आहे.स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून त्यांनी कोविड असलेल्या रूग्णांवर उपचार केले आणि रोगाचा प्रसार रोखण्यास देखील मदत केली.अशा व्यक्तींचा आदर करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अंबुजा सिमेंटच्या कॉर्पोरेट कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने अंधेरीयेथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय ध्वज फडकवण्यासाठी खास आमंत्रित केले.कोविड महामारीमध्ये जीव वाचवण्यासाठी आणि पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी ऑक्सिजनचे महत्त्व कळाले त्यासाठी नैसर्गिक ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा व्हावा याकरिता जास्तीत जास्त झाडे लावण्यापेक्षा दुसरा चांगला मार्ग नाही हे लक्षात घेऊन आंबुज सिमेंट च्या कार्यालय परिसरात स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या निमित्ताने वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाला डॉ.स्मिता चव्हाण सेव्हनहिल्सच्या अतिरिक्त डीन,डॉ.विप्लोव जाधव,डॉ प्रज्ञा पवार,डॉ.राहुल सावलिया,श्री.अनिकेत इंगळे व इतर डॉक्टर्स उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन राजेश आंबोकर प्रमुख प्रशासन अंबुजा सिमेंट यांनी केले
