▪️ राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक काल उशीरा पार पडली. या बैठकीत बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी मुंद्रांक शुल्काबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून तसंच राज्यातील कोरोना स्थिती आणि लसीकरणाचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
▪️त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना आवाहन केलं आहे.
???????? मुख्यमंत्री म्हणाले..:
▪️ राज्यातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे आरोग्य विभागाची आकडेवारी सांगते. ही दिलासादायक बातमी असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱया लाटेला निमंत्रण देऊ नका, असे आवाहन जनतेला केले आहे.
▪️ आगामी सण आणि उत्सवांमध्ये गर्दी टाळा, तिसरी लाट येणार नाही याची खबरदारी घ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
▪️ कोविडविषयक नियमांचे पालन न केल्याने तसेच गर्दी जमा करणे, मास्क न लावणे यामुळे स्वतःच्याच नव्हे, तर इतरांच्या आरोग्यालाही आपण धोका पोहचवत आहोत असेही ते म्हणाले.
