सार्वजनिक आरोग्य खाते( एन विभाग ) आणि आदर्श सिद्धांत वेल्फ़ेअर फ़ाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अरुणकुमार वैद्य गार्डन घाटकोपर (पु) येथे १८ वर्षावरील सर्व नागरीकांसाठी मोफत कोविड वॅक्सीन - कोविशिल्डची पहिली व दुसरी लस देण्यातआली.शासकीय कर्मचारी व खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी तसेच परदेशी प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी २८ दिवसानंतर त्वरीत कोविशील्डची दूसरी लस देण्यात आली प्रसंगी एन विभागाचे आरोग्य अधिकारी डाॅ.महेंद्र खंदाडे (एम.ओ.एच),शैलेश सोनावणे,दिक्षा सोनावणे (सी.ई.ओ.) आदर्श सिद्धांत वेल्फ़ेअर फ़ाउंडेशन,तारा खान,डाॅ.संपदा नलावडे तसेच आपतक़ालीन सेवा केंद्राचे अध्यक्ष रामदास साळवी यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली.
